नाव तुझ्या ओठावर माझे
धरती माझी अंबर माझे
स्पर्शामधला प्रश्न तुझा अन
मौनामधले उत्तर माझे
रात्र तुझ्या स्मरणात काढतो
स्मरण तुझे झाले घर माझे
अखेर तुज कळली सुंदरता
बघितलेस तू अंतर माझे
मला बिलगला गंध तुझा अन
तुला लागले अत्तर माझे
हा सारा माझाच उन्हाळा
हे सारे गुलमोहर माझे
- वैभव देशमुख
वाह वाह!
ReplyDeleteतुमची खूप प्रसंशा ऎकली आहे.
गणेश कोळकर कडून.
hee maajhee favourite ahe!
ReplyDeletehee maajhee favourite ahe!
ReplyDelete